महिलांच्या सक्षमीकरणासाठी, एक सुरक्षित आणि प्रगतीशील जग उभं करत आहोत

शिक्षण • कौशल्य विकास • स्वावलंबन • आरोग्य • न्याय व सुरक्षितता

आमचे उद्दिष्टे

program-3.svg

प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण

आमचे ध्येय म्हणजे महिलांना अशी कौशल्ये देणे ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील.
program-3.svg

मुलींसाठी सुरक्षित आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण

आम्ही मुलींना केवळ शिक्षण देण्यावर नाही तर शिक्षण सुरक्षित, प्रेरणादायी आणि संधी-समृद्ध बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो.
Info Box

महिलांच्या आरोग्यासाठी मोफत तपासणी, जनजागृती आणि हेल्थ कॅम्प

महिलांचे आरोग्य हे त्यांच्या संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याशी जोडलेले आहे.
Info Box

संकटग्रस्त आणि अत्याचारित महिलांना त्वरित मदत व मार्गदर्शन

अत्याचार, हिंसा, भावनिक ताण किंवा कोणत्याही संकटात सापडलेल्या महिलांसाठी आम्ही तात्काळ मदतीची व्यवस्था उपलब्ध करून देतो.
Info Box

ग्रामीण व शहरी भागात महिला स्व-सहाय्यता गट बळकट करणे

Self-Help Groups (SHGs) म्हणजे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया.
Info Box

रोजगार संधी, उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन प्रकल्प

महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकण्यासाठी आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत देतो.

आम्ही कोण?

जय जिजाऊ महिला संघ ही महाराष्ट्रातील महिला, मुली आणि कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी सार्वजनिक ट्रस्ट आहे.

आमचा विश्वास — “जिजाऊंच्या प्रेरणेतून उद्याचा समाज घडतो.” आम्ही महिलांना शिक्षण, कौशल्य, आरोग्य, कायदेशीर मदत, रोजगार आणि आत्मनिर्भरता यासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य देण्याचे ध्येय बाळगतो. समाजातील सर्व स्तरांपर्यंत महिला सुरक्षित आणि सक्षम बनल्या तरच खरी प्रगती शक्य आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे.

आमचे उपक्रम

program-3.svg

कौशल्य विकास प्रशिक्षण

जय जिजाऊ महिला संघ महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये शिकवण्यावर विशेष भर देतो. शिवणकाम, ब्यूटी पार्लर प्रशिक्षण, संगणक साक्षरता आणि मेहेंदी आर्ट यांसारख्या व्यावहारिक कौशल्यांचे प्रशिक्षण आम्ही नियमितपणे आयोजित करतो. तसेच स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी उद्योजकतेचे मूलभूत तत्त्व, व्यवसाय नियोजन, वित्त व्यवस्थापन आणि बाजारपेठेची समज या विषयांवरही मार्गदर्शन केले जाते. या उपक्रमांचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता आणि आत्मविश्वास देणे.
program-3.svg

आरोग्य व स्वच्छता मोहिमा

महिलांच्या आरोग्याची काळजी हा आमच्या कामाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ग्रामीण आणि शहरी भागात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, विविध रोगांबाबत जनजागृती कार्यक्रम आणि पोषण व स्वच्छता याबाबत मार्गदर्शन आम्ही सातत्याने आयोजित करतो. मासिक पाळी स्वच्छतेविषयी योग्य माहिती देणे, सुरक्षित पद्धतींचा प्रसार करणे आणि गरजूंना साहित्य उपलब्ध करून देणे हेही आमच्या मोहिमेचे महत्त्वाचे घटक आहेत. यामुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास दोन्ही मिळतात.
Info Box

समुपदेशन व कायदेशीर मार्गदर्शन

महिलांचे आरोग्य हे त्यांच्या संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याशी जोडलेले आहे. म्हणून आम्ही खालील उपक्रम राबवतो: मोफत स्वास्थ्य तपासणी (BP, Diabetes, Hemoglobin, Breast/ Cervical awareness) पोषण आणि मासिक पाळी स्वच्छता (Menstrual Hygiene) जनजागृती मानसिक आरोग्य व समुपदेशन गर्भवती स्त्रियांसाठी विशेष मार्गदर्शन ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी मोबाईल हेल्थ कॅम्प या उपक्रमामुळे महिलांना वेळेवर उपचार, आरोग्य विषयक जागरूकता आणि योग्य जीवनशैलीचा मार्ग मिळतो.
Info Box

स्व-सहाय्यता गट तयार करणे

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे समाजातील प्रगतीचे खरे मोजमाप आहे. म्हणूनच आम्ही विविध भागांत महिला स्व-सहाय्यता गट (Self Help Groups) स्थापन आणि बळकट करण्यासाठी काम करतो. बचत कशी करावी, गट आर्थिक व्यवस्थापन कसे करावे, कर्ज योजना आणि सरकारी योजनांचा लाभ कसा मिळवावा, तसेच लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन—या सर्व बाबींमध्ये महिलांना प्रशिक्षण दिले जाते. या गटांमुळे महिलांमध्ये परस्पर सहकार्य, नेतृत्वगुण, आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरता वाढते.
Info Box

शिक्षण व मार्गदर्शन

मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित आणि पुढे जाण्यास प्रेरणा देणारे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी संस्थेची विशेष कार्ययोजना आहे. शालेय आणि महाविद्यालयीन मुलींना शैक्षणिक सहाय्य, अभ्यास मार्गदर्शन, तसेच उच्च शिक्षण आणि व्यवसाय निवडीसाठी करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक विद्यार्थिनीला तंत्रज्ञानाची ओळख असणे आवश्यक आहे, म्हणूनच डिजिटल साक्षरता आणि संगणकाच्या मूलभूत कौशल्यांचे प्रशिक्षणही दिले जाते.